मुंबई, विशेष प्रतिनिधीः भाजप सरकारने लादलेला अन्नदाता शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांच्या व दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई काँग्रेसने शनिवारी 5 डिसेंबर रोजी संपूर्ण मुंबईत धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. सर्व ब्लॉक अध्यक्ष यांनी एकत्रितपणे प्रत्येक वार्डात हे आंदोलन केले जाईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.
सर्व शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेली दहा दिवस झाले उन्हा तान्हात उपाशीपोटी आंदोलन करत आहेत. भाजप सरकारने जबरदस्तीने मंजूर केलेले शेतकरी विरोधातील काळे कायदे त्यांना मंजूर नाही आहेत, ते त्या विरोधात आंदोलन करत आहेत, पण या भाजप सरकारला त्यांची काहीच काळजी नाही आहे. हे सरकार फक्त चर्चा व वाटाघाटी करत आहेत. हे शेतकरी विरोधातील कायदे काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी मंजूर केलेले आहेत. काँग्रेसने सुरुवातीपासून या काळ्या कायद्यांचा विरोध केलेला आहे, भाजप सरकारचा निषेध केलेला आहे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे म्हणूनच मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही शनिवारी संपूर्ण मुंबईभर धरणे आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.