रत्नागिरी,(विशेष प्रतिनिधी) : बस अपघातामध्ये मृत पावलेल्या 30 कर्मचार्यांना आज दापोली विद्यापीठाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यापीठाच्या आवारात कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
आंबेनळी घाटाच्या दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण दापोली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दररोज भेटणाऱ्या आपल्याच कर्मचा-यांचा मृत्यूने विद्यापीठ सूनसून झालं आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी कर्मचारी कार्यालयात दाखल झाले खरे. परंतु आजूबाजूला आपले सहकारी नाहीत याचा त्यांना विश्वास बसत नव्हता. प्रत्येकजण भावनाविवश झाला होता..