नाशिक : मार्गदर्शक, तत्त्वनिष्ठ आणि ध्येयाशी एकनिष्ठ, मार्क्सवादावर अढळ विश्वास असणारे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे काल(2 ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता डॉ.कराड हॉस्पिटल, नाशिक येथे दुःखद निधन झाले.
कॉम्रेड शिराळकर हे आयआयटी शिकलेले. लाखोचं पॅकेज धुडकावून गरीब-कष्टकरी आदिवासी जनतेसाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला. ७०च्या दशकात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या ठिकाणी ते गेले. तेथील जनतेत काम केले. तेथे त्यांनी शेतमजुरांची भक्कम युनियन उभारली. शेवटपर्यंत ते तिथेच राहिले. त्यात जनतेत जगले. कॉम्रेड शिराळकर हे विचारांवर प्रचंड विश्वास आणि प्रचंड त्यागी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी विचारांप्रति कधीही तडजोड केली नाही.
कॉम्रेड शिराळकर कायम स्मरणात राहतील. ते चळवळीच्या संघर्षात जिवंत राहतील, असे SFI महाराष्ट्र राज्य कमिटीने म्हटले आहे.