रत्नागिरी : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. रत्नागिरीतील हातखंबा येथे रस्ता रोको करण्यात आला होते. रास्ता रोकोमुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प होती. रत्नागिरी तालुक्यात हा बंद १०० टक्के यशस्वी झाला होता. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रस्ता रोको करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे, सचिन आचरेकर,सं केत चवंडे, अशोक वाडेकर, मोहंमद साखरकर, नित्यानंद दळवी,अजिक्य राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा हे गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई पोलीस अधिनियम १३५ अंतर्गत कलम१४३,१४९,३४२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.