मुंबई : कोव्हिड-१९ या आजाराच्या विरोधात जगातील सर्व नेते अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहनपर पॅकेज देऊन एकत्र आले असले तरी दीर्घकालीन आर्थिक मंदीचे मोठे सावट आज कमोडिटीज मार्केटवर दिसून आले. कमोडिटीजमधील गुंतवणूक धोरणात संतुलन साधत गुंतवणूकदार जणू काही एका दोरखंडावर चालत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने:
मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती सपाट होत्या. कारण अमेरिकेच्या डॉलरमुळे गुंतवणूकादारांनी नफ्यासाठी उच्चांक गाठला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महिन्याच्या लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या मार्केटच्या भावनांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच सुरक्षित मालमत्तेकडे गुंतवणूकादारांना ओढा कमी करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचचली गेली. मात्र याच वेळेला कोरोनाच्या साथीमुळे २.१ दशलक्ष लोक संसर्गग्रस्त, १, ४७,५१२ लोकांचा मृत्यू झाला असल्यामुळे सोन्याच्या किंमतींना पुन्हा आधार मिळाला. जगभरातील आर्थिक घडामोडी लवकरच सुरू होतील, या आशएने गुंतवणूकदारा सोन्याची मालमत्ता सोडण्यास तयार नाहीत.
चांदी:
मागील आठवड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती २ टक्क्यांनी कमी होऊन $15.1 प्रति औसांवर बंद झाल्या. तसेच एमसीएक्सच्या किंमती ०५१ टक्क्यांनी वाढून ४४,२५५ रुपये प्रति किलो वर थांबल्या.
कच्चे तेल:
मागील आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमती ७ ट्क्यांनी वाढल्या. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कच्च्या तेलाच्या मागणीवर मोठा परिणाम केला. मंदीविषयक चिंता वाढल्या त्यामुळेही कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम होऊन त्याच्या किंमती गडगडल्या. परिणामी ओपेक आणि सदस्य राष्ट्रांनी काही काळासाठी दररोज तेलाचे उत्पादन १९.५ दशलक्ष बॅरलने कमी करण्याचा निर्णय घेतला.
बेस मेटल्स:
गेल्या आठवड्यात, लंडन मेटल एक्सचेंजमधील बेस मेटलच्या किंमती १.१ टक्क्यांनी घसरल्या. लीड धातू यास अपवाद होता. प्रमुख सेंट्रल बँकांनी धातूचा प्रमुख ग्राहक असलेल्या चीनकडून मागणीत सुधारणा होईल या आशेने काही प्रोत्साहनपर उपाययोजना केल्या. यामुळे बेस मेटलच्या किंमतींना थोडा आधार मिळाला.
तांबे:
चीनमधील मागणीत वाढ होईल, या आशेने मागील आठवड्यात तांब्याच्या किंमती एलएमईवर ०.८ टक्क्यांनी वाढल्या. चीन हा जगातील तांब्याचा सर्वात मोठा ग्राहक असून अनेक महिन्यांच्या लॉकडाउननंतर चीनने अर्थव्यवस्थेचे कामकाज पुन्हा सुरू केले आहे. २०२० पासून एलएमई व्हेरिफाइड गोदामातील तांब्याचे यादीचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. यामुळे लीडर मेटलच्या मागणीत तीव्र घट आणि तांब्याच्या किंमत वाढीतही मर्यादा आल्याचे दिसून आले.