मंगलोर : भारतीय तटरक्षक दलाने मंगलोरजवळ भरकटलेल्या मंजेश्वरी या मासेमारी नौकेतल्या सात मच्छिमारांची सुटका केली. वादळी वारे आणि मोठ्या लाटांमुळे ही नौका धोक्यात सापडली आणि नौकेवरच्या मच्छिमारांनी सुटकेसाठी इशारा केला.
संकटात सापडलेल्या या नौकेच्या हाकेला प्रतिसाद देत तटरक्षक दलाच्या परिचालन पथकाने धाव घेतली आणि तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले आणि राजदूत या दोन्ही नौकांनी अडकलेल्या मच्छिमारांची सुटका केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.