मुंबई : नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ते आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू येशू यांनी जगाला मानवतेची शिकवण दिली. प्रेम, करुणा आणि वात्सल्याचा संदेश घेऊन येणारा हा सण आपण सारे उत्साहात साजरा करू यात आणि त्यांचा मानवतेचा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणू यात.