
मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्हा परीषदेचे अध्यक्ष रोहन बने यांच्या संकल्पनेतून जवळपास ३० हजार काजू रोपांचं वाटप करण्यात आलं. संगमेश्वर तालुक्यातील 10 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 याप्रमाणे 30 हजार रोपांचे आजच्या दिवशी वाटप करण्यात आलं. तुरळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतही विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी ही रोपे देण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष रोहन बने, चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी इंदुराणी जाकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे उपस्थित होते. सध्या ल़ॉकडाऊन असल्यानं शाळा बंद आहेत. परिणामी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ही रोपे पोहोचवली गेली आहेत. कोकणात फळ झाडं लागवड वाढावी. त्यातून भविष्यात चांगलं आर्थिक इनकम मिळावं असा यामागील उद्देश असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी म्हटलं आहे.