मुंबई : मिन्स्क-बेलारूस येथे होणाऱ्या रिदमीक जिमनॅस्टीक या क्रीडा प्रकारासाठी वल्ड कप स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होणा-या भारतीय संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघ समुह सादरीकरण आणि वैयक्तिक सादरीकरण स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघात सातही मुंबईच्या युवतींची निवड झालेली आहे. धारावी येथील शासन क्रीडा संकुलात प्रशिक्षक वर्षा उपाध्ये या त्यांना प्रशिक्षण देत आहेत. बेलारूस येथे होणारे वर्ल्ड कप स्पर्धा 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत 48 देश सहभागी होणार आहेत.