डोंबिवली,(प्रशांत जोशी) : मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पार्टीचेच सरकार करत असून हे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.
भाजपाच्या प्रदेश माध्यम विभागाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलते होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये व प्रबोधिनीचे महासंचालक रविंद्र साठे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारचे प्रयत्न जनतेपर्यंत पोहचवावेत.
त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाचे प्रवक्ते, चर्चा प्रतिनिधी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाने व सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. प्रसिद्धीप्रमुख हा पक्ष – सरकार व जनता यांच्या दरम्यान महत्त्वाचा दुवा आहे.