मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या विविध भागातून आलेल्या शेतकरी भगिनींनी आज वर्षा निवासस्थानी औक्षण करुन त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात राखी बांधली व शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा महत्वपुर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. हा एक उपाय आहे परंतु शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आणि शेतकरी समृद्ध होईपर्यंत हा लढा चालू राहील. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीत आपले सरकारच्या माध्यमातून फॉर्म भरावा असे सांगून त्यांनी सर्व महिला शेतकरी भगिनींना रक्षाबंधनानिमित शुभेच्छा दिल्या.