मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरीत
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दि. २५ मे रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :- सकाळी 10.00 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता पोलीस विभागाकरिता चार चाकी व दोन चाकी वाहने सुपूर्द करण्याचा सोहळा. (स्थळ : शासकीय तंत्रनिकेतन परिसर) सकाळी 10.45 वाजता उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कौशल्य विकास या वास्तूचे लोकार्पण . (स्थळ : शासकीय तंत्रनिकेतन परिसर) सकाळी 10.55 वाजता मा. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथील शासकीय विभागीय ग्रंथालय नुतनीकरण वास्तुचे लोकार्पण. (स्थळ: लोकमान्य टिळक स्मारक मंदीर ) सकाळी 11.05 वाजता मोटारीने स्व. प्रमोद महाजन क्रिडा संकुलाकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : प्रमोद महाजन क्रिडा संकुल). दुपारी 01.45 वाजता दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी वाहन, कृषी यंत्र व कामगार कीटचे प्रातनिधीक स्वरुपात वाटप. (स्थळ : प्रमोद महाजन क्रिडा संकुल) दुपारी 02.00 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 02.10 वाजता शासकीय विश्रामगृहावर आगमन व राखीव. दुपारी 03.00 वाजता मोटारीने विमानतळाकडे प्रयाण व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.