मुंबई : भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठे उत्सवपर्व असलेल्या दीपावलीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले आहे.
दीपावलीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणतात, दीपावली हे आनंदाचे आणि उत्साहाचे पर्व आहे. हे पर्व साजरे करताना आपल्या परंपरा जपण्यासह पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ हवा ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे. तसेच या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाशफुले उमलावित यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.