मुंबई : जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, इस्राईलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन, केंद्रीय मंत्री अरूण जेटली, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, जे. पी. नड्डा, राजीवप्रताप रुडी, रामविलास पासवान, थावरचंद गेहलोत, जयंत सिन्हा, विजय गोयल, बंडारु दत्तात्रय, अनंतकुमार, डॉ. महेश शर्मा, मनोज सिन्हा, हंसराज अहिर, राज्यवर्धन राठोड, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी, मनेका गांधी, तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवीर दास, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्य मंत्रिमंडळातील प्रकाश महेता, पंकजा मुंडे, डॉ. दीपक सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य, राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ नेते ओम माथूर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार पूनम महाजन, खासदार राजीव सातव, आमदार आशिष शेलार, प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, आयुषमान खुराना यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.