मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव भारताचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. येत्या पाच वर्षात हा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनीसुद्धा यातील एक संकल्प स्वीकारून तो पूर्ण करून यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी गणेश मंडळ व पोलीसांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मिरजमधील गणेशोत्सव संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी खासदार संजय पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश शेठ, जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पृथ्वीराज देशमुख, राजाराम गरुड, दीपक शिंदे, शरद नलावडे, सुरेंद्र चौगुले, मकरंद देशपांडे यांच्यासह मिरज शहर गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सव मंडळाच्या समस्या ऐकून घेतल्या. फडणवीस म्हणाले की, मिरजमधील गणेशोत्सव मंडळांना नियमानुसार परवानगी द्यावी. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी. या काळात दारू विक्रीची दुकाने लवकर बंद करण्यासंदर्भात पोलिसांनी पावले उचलावीत.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्याने राबविलेल्या डॉल्बीमुक्त उत्सव या उपक्रमाचे कौतुकास्पद करून हा उपक्रम यंदाही राबविण्यात यावा.