ठाणे : आयुर्वेदावर आधारित क्लिनिकल कॉस्मोटोलॉजी अभ्यासक्रमाची नववी बॅच नुकतीच ठाणे येथे संपन्न झाली. आयुर्वेदाचार्य कीर्ती देव यांचे मार्गदर्शन या बॅचला लाभले. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नुकतेच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
वैद्य कीर्ती देव या ठाणे येथे या अभ्यासक्रमाचे वर्ग चालवतात. आयुर्वेदाचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम आठ आठवड्यांचा आहे.
या अभ्यासक्रमात ट्रायकाॅलाॅजी, स्कीन अॅस्थेटिक्स आणि अॅरोमा थेरपी हे विषय शिकवले जातात. त्याचा वैद्यांना त्यांच्या व्यवसायात त्वचा आणि केशविकारांच्या समस्यांवर चांगला उपयोग होऊ शकतो, असे कीर्ती देव यांनी सांगितले.