मुंबई : क्लिअरटॅक्स या भारताच्या आघाडीच्या टॅक्स आणि गुंतवणूक मंचाने निल जीएसटी रिटर्न फायलिंग नामक नवीन फीचर लॉन्च केल्याचे जाहीर केले. हे एक अनोखे फीचर आहे जे सीए आणि व्यवसाय यांना त्यांचे निल जीएसटी रिटर्न काही सेकंदांत फाइल करण्यास मदत करेल.
क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले की , “आज सीए आणि व्यवसायांना जीएसटी समजून घेणे व त्याचे पालन करणे हे एक आव्हान वाटते आहे. आमच्या हे लक्षात आले आहे की, वापरकर्त्यांना निल जीएसटी रिटर्न फाइल करताना ‘एरर’ संदेश येतात. म्हणून, त्यांचे आर्थिक जीवन सुकर करण्यासाठी आम्ही एक विश्वासार्ह रिटर्न फायलिंग लॉन्च केले आहे,जे सीए आणि व्यवसायांना निल जीएसटी रिटर्न आरामात भरण्यासाठी मदत करेल, आणि अशा प्रकारे जीएसटी नियमांचे पालन ते सहजपणे करू शकतील.”
वापरकर्त्यांना यासाठी फक्त क्लिअरटॅक्स जीएसटी डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करायचे आहे. क्लिअरटॅक्स जीएसटी डेस्कटॉप अॅप एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर ते कमीत कमी टप्प्यांत कोणत्याही अडचणीशिवाय वापरकर्त्यांना जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-३बी फाइल करण्यास मदत करते. अशाप्रकारे, करदात्याला इतर कोणत्याही पोर्टलची मदत घेण्याची गरज नाही, कारण क्लिअरटॅक्स जीएसटी सॉफ्टवेअरमध्ये रिटर्न दाखल करण्यासकट सर्व काही उपलब्ध आहे. वापरकर्ते कमीत कमी मॅन्यूअल प्रयत्नांनी थेट क्लिअरटॅक्सवर जीएसटीआर-१ त्यास डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आणि इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोडची जोड देऊन फाइल करू शकतात.