
मुंबई : आयकर परतावा भरण्याचे समाधान प्रदान करणा-या क्लिअरटॅक्स या आर्थिक-तंत्रज्ञान मंचाने आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०)साठी आयकर परताव्याकरिता मोफत ई-फायलिंग सुविधा प्रदान करण्याकरिता एचडीएफसी या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेसह भागीदारी केली आहे. याद्वारे एचडीएफसी बँकेच्या ५० लाखांहून अधिक ग्राहकांना आयकर परताव्याकरिता व्यक्तिविशिष्ट सीए-सहाय्यकाची सुविधादेखील उपलब्ध होईल.
एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंग मंचावरून क्लिअरटॅक्सची सोल्युशन्स ग्राहकांना आयकर परताव्याच्या ई-फायलिंगमध्ये येणा-या अडचणी सोडवण्यास मदत करतील. क्लिअरटॅक्सचा सुरक्षित मंच केवळ ७ मिनिटात मोफत ई-फायलिंगची सुविधा देतो. ज्यांना फायलिंगमध्ये मदत लागते, त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात चार्टर्ड अकाऊंटंट्स (सीए) सेवा कोणतीही गुंतागुंत सोडवण्यासाठी उपलब्ध असतील.
क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, “एचडीएफसी बँकेसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. एचडीएफसी बँकेच्या मोठ्या ग्राहक वर्गाला आमच्या टॅक्स फायलिंग सेवा देऊन आणि आमच्या अनुभवाच्या मदतीने आयकर परतावा अनुपालन सुलभ करून आम्ही एकत्रितपणे त्यांचा अनुभव सोपा करू आणि कोणत्याही अडचणींशिवाय त्यांना ई-फायलिंगसाठी सक्षम बनवून कर वाचवण्यास मदत करू शकू.”















