मुंबई : आयकर भरणे, जीएसटी अनुपालन आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकीवर उपाय पुरविणा-या क्लिअरटॅक्स या भारताच्या सर्वाधिक वेगाने वाढणा-या फिनटेक कंपनीने करदात्यांना आयकर परतावा विनामुल्य भरण्यास मदतीसाठी ‘क्लिअरटॅक्स ई-फायलिंग’ हे आपले नवीन अॅप सुरू करण्याची घोषणा केली. या अॅपचा उपयोग करदाता त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवर ई-फायलिंग पूर्ण करण्यासाठी करू शकतात.
क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, “नवीन अॅ प आपल्या सुलभ इंटरफेसमुळे अतिशय व्यस्त लोकांना त्यांचा आयकर भरणे खूपच सोपे बनवते. एकाच टॅपद्वारेवापरकर्ता फॉर्म १६ अपलोड करू शकतो आणि त्यांचे आयकर विवरण ७ मिनिटांत दाखल केले जाऊ शकते.”
क्लिअरटॅक्स अॅप करदात्यांना त्यांचे फॉर्म १६ अपलोड करण्यास परवानगी देते आणि त्यानंतर ते त्यांचा आयटीआर फॉर्म स्वयंचलितपणेसादर करतात. आर्थिक वर्षात जर करदात्याने एकापेक्षा जास्त नियोक्त्यांकडे नोकरी केली असेल तर तो किंवा ती त्यांचे आयटीआर दाखल करण्यासाठी अॅपवर एकापेक्षा जास्त फॉर्म १६ अपलोड करू शकतात. करदाता देखील अॅपवर स्वतःहून उत्पन्न तपशील जोडू शकतात आणि क्लिअरटॅक्स आपोआप कोणत्याही कर दायित्वाची मोजणी करेल. ज्या करदात्यांना मदतीची आवश्यकता आहे ते त्यांचे आयटीआर दाखल करण्यासाठी तज्ञांच्या मदतीची निवड करू शकतात. क्लिअरटॅक्स अॅप आयकर फायलिंग पोर्टलवर डेटा आधीच भरण्याचा पर्याय देखील प्रदान करते.