मुंबई : कोविड १९ या जागतिक आपत्तीमुळे अनेक उद्योग देशोधडीला लागले. तरीही, अनेक उद्योगांनो समयसुचकता दाखवत आपल्या व्यवसायात बदल घड़वले. असाच एक यशस्वी प्रयत्न क्लासिक बिझनेस कार्पोरेशनने केला आहे. आज लॉकडाउन सुरू आहे. सर्व उद्योग लॉकडाउनच्या चक्रात अडकले आहेत. यापुढे नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळणे आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. हेच ध्यानात ठेवून ‘फुट प्रेस सॅनिटायझर स्टँड’ मशीन मार्केटमध्ये आणली आहे, असे क्लासिक बिझनेस कार्पोरेशनचे गिरीश मळगावकर यांनी सांगितले.
आमचे वसई येथे पावडर कोटिंगचे यूनिट आहे. तिथे आम्ही प्रायोगिक तत्वावर स्टँडस बनवून काही सोसायट्यांना मोफत दिले. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आला. या स्टँडची वैशिष्ट्ये म्हणजे कोणताही स्पर्श न करता पायाने पैडल दाबले की बाटलीमधून सॅनिटायझर लीक्वीड ड्रॉप्स हतावर येतात. स्टँडचे वजन ५ किलो आहे. त्यामुळे जमीनीवर ग्रिप चांगली मिळते. पावडर कोटिंग केलेले असल्यामुळे लूक चांगला आलाय, अशी माहिती मळगावकर यांनी दिली. गृहनिर्माण सोसायटी, कार्यालये, मॉल, शॉप्स, रुग्णालये, कारखाने आदि ठिकाणी फुट प्रेस सॅनिटायझर स्टँड उपयोगी असणार आहे.
किंमत : १४५० + १०० रुपये, डिलीवरी चार्जेज (मुंबईसाठी फक्त)
संपर्क : 9322590613