- भारतातील या आजाराच्या संकटाबद्दल मत: आरोग्याच्या बाबतीत ‘गुड’, आर्थिक बाबतीत ‘पूअर’.
- लॉकडाउन दरम्यान बालकांचे मानसिक आरोग्य व कल्याण हे प्रमुख आव्हान
मुंबई : टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट्स व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनीने 16 शहरांमध्ये 10 एप्रिल ते 22 एप्रिल 2020 या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आधारित असणारा अहवाल आज जाहीर केला आहे. “टीआरएज कोरोनाव्हायरस कन्झ्युमर इन्साइट्स 2020″ असे शीर्षक असणारा हा अहवाल 16 शहरांतील 902 शहरी नागरिकांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ महिनाभर घरामध्ये ऐच्छिक नदरकैदेत असणाऱ्या या नागरिकांचा दृष्टिकोन, चिंता, भीती, अपेक्षा यांचा समावेश करण्यात आला आहे.
या अहवालाच्या मते, लॉकडाउनच्या निर्णयाचा एकंदर प्रभावीपणा सर्व शहरांमध्ये 91% होता, 16 शहरांनी 98% हून अधिक किंवा ‘एक्सलंट’ स्कोअर नोंदवला. परंतु, सर्व शहरांमध्ये या निर्णयाची एकंदर अंमलबजावणी बरीच कमी, म्हणजे 74% झाली. अहवालातील निष्कर्षांविषयी बोलताना, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी सांगितले, “लॉकडाउनचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यामध्ये 24% इतकी लक्षणीय तफावत आहे. कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाबद्दलची माहिती व ज्ञान या बाबतीतही मोठी तफावत आहे. प्रामुख्याने 21 ते 24 वर्षे आणि 46 ते 50 वर्षे या दोन वयोगटांमध्ये हे दिसून येते. मुंबई वगळता, अन्य सर्व शहरांत माहितीबद्दल अशीच तफावत आहे. चुकीच्या माहितीचा परिणाम लोकांच्या दृष्टिकोनावर व कृतींवर होतो आहे. जसे, मांस किंवा अंड खाण्याबद्दलचे मत.”
“आजाराशी सामना करत असताना भारताच्या आरोग्यविषयक क्षमतेबद्दल ग्राहकांना मोठा विश्वास आहे, म्हणजेच 73% आणि हे प्रमाण ‘गुड’ असे म्हटले जाते, तर आजाराशी सामना करत असताना भारताच्या आर्थिक क्षमतेबाबत त्यांचा विश्वास 63% इतका कमी आहे. म्हणजेच, लोकांच्या मनात दीर्घकाळीन आर्थिक व वित्तीय परिणामांबाबत प्रचंड भीती असल्याचे दिसून येते”, असे चंद्रमौली यांनी नमूद केले.
या आजाराशी लढा देत असताना, मुलांवर परिणाम झाला आहे आणि ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आलेली नाही व त्यावर उपाय करण्यात आलेला नाही, असे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. या दोन्हीसाठी कोपिंग इंडिसेस लक्षणीय वेगळे होते. “लॉकडाउन दरम्यान मुलांसमोर असलेला संभ्रम व चीडचीड यावर थेट उपाय न करता पालक त्याकडे सर्वसाधारण बाब म्हणून पाहत आहेत. मुले व कुटुंब यांच्या कोपिंग स्कोअर्समध्ये हे स्पष्टपणे दिसून येते. लॉकडाउन दरम्यान मुलांना कमालीचा त्रास होत असल्याची दखल पालकांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी मुलांना प्रेमाने व सहानुभूतीने समजावून सांगणे व त्यांना योग्य मार्गदर्शन करणे यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे.”
फॅमिली वरी इंडेक्समध्ये, सर्व शहरांमध्ये सर्वात मोठी चिंता आजाराची लागण होऊ शकते, ही आहे (74%), त्यानंतर नोकरी/व्यवसाय गमावण्याची चिंता दुसऱ्या क्रमांकावर आहे (68%), आणि उशिरा झालेला पगार ही तिसऱ्या क्रमांकाची चिंता आहे (62%). लखनौमध्ये फॅमिली वरी इंडेक्स सर्वाधिक, म्हणजे 85% होता, त्यानंतर नागपूरमध्ये 81% होता. इकॉनॉमिक इम्पॅक्ट वरी इंडेक्स 66% असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.
बहुतेकशा शहरांना या आजाराच्या लक्षणांबद्दल तुलनेने माहिती आहे, परंतु त्यांना आजाराच्या संक्रमणाबद्दल विशेष माहिती नाही. संक्रमणाच्या आजाराबाबत चुकीची माहिती असण्याचे प्रमाण दिल्लीमध्ये सर्वाधिक आहे, तर त्यानंतर चंडीगड येथे आहे. दिल्लीने आजाराच्या लक्षणांबद्दलच्या ज्ञानाबद्दल सर्वाधिक स्कोअर नोंदवला आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक असून, तेथे हे प्रमाण दोन-तृतियांश कमी आहे.