
मुंबई, (निसार अली) : मुंबईची खरी नागरी संस्कृती ही सर्वधर्मसमभाव जपणे आहे. दर्गा असो, माऊंट मेरीची जत्रा असो वा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सण असो; सर्व धर्मीय हे सण साजरा करतात. यात कोणताही भेदभाव नसतो. याच संस्कृतीचा वारसा सांगत मालवणी येथील जेनिफर मुदलिआर-स्वामी 2O वर्षांपासून गणेश मूर्तीची मनोभावे प्रतिष्ठापना करत आहेत.
सामाजिक ऐक्य व सर्वधर्मसमभाव जपला जावा, अशी प्रार्थना मी गणरायाकडे करत आहे, असे जेनिफर सांगतात.
जेनिफर या ख्रिस्ती धर्मीय आणि त्यांचे पती शेखर हे हिंदू धर्मीय आहेत. गणेशोत्सवात दोन्ही कुटुंबातील सदस्य सहभागी होतात आणि समाजात सामाजिक सलोख्याचा संदेश देत आहेत.
आरतीच्या वेळी जेनिफरची बहीण मेरी, एलिझाबेथ, शेखर यांची बहीण सरोज व तिचा पती प्रताप, जी एस राजू , प्रज्ञा मायकल, हर्ष, संजना पॉल दास आदी सद्स्य मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.















