रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील चिवेली गावातील डोंगर देखील आता खचू लागला आहे. डोंगर खचू लागल्याने माती रस्त्यावर येत आहे, त्यामुळे या मार्गावरच्या वाहतूकवरही परिणाम होत आहे. प्रशासनाकडूनही याबाबत पाहणी करण्यात आली.
चिवेली फाटा ते चिवेली बंदर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगराच्या काही भागाची कटाई करण्यात आली होती. मात्र सध्या या डोंगराचा काही भाग खचू लागला आहे. गुरुवारी काही भाग खचला होता. त्यानंतर शुक्रवारीही काही भाग खचला आणि माती, झाडं थेट रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर प्रशासनाकडून ही माती, दरड, झाडं बाजूला करण्यात आली. आणि मार्ग खुला करण्यात आला. मात्र यापासून ग्रामस्थांना कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.