
मुंबई : ‘राम पब्लिसिटी’ आणि ‘गगनराज एन्टरटेन्मेंट क्रिएटर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी चित्रपट निर्मितीची सुप्त इच्छा बाळगणार्या रसिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी विश्वसनीय जाणकार दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मातीची अभूतपूर्व संधी प्राप्त होणार आहे. नव्या निर्मात्यांना योग्य बजेटमध्ये भागीदारी तत्वावर सदर संस्था चित्रपट निर्मिती पासून ते वितरणापर्यंत त्यांच्यासमवेत कार्यरत रहाणार आहे. चित्रपट निर्मितीत नवखे निर्माते बर्याचवेळा निर्मितीत पदार्पण करतात. सखोल अभ्यासा अभावी त्यांची फसगत होते. त्यातून त्यांचे मानसिक आर्थिक नुकसान होते. अशा नवोदित निर्मात्यांना चित्रपट निर्मितीचा निखळ आनंद तसेच आर्थिक लाभ याचे पूर्ण नियोजन करूनच नव्या चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. संपूर्ण चित्रपट निर्मितीसाठी अपुरे पैसे असण्यार्या उद्योजकांना भागीदारी तत्वावर ठराविक रक्कम भरून या चित्रपटनिर्मितीत निर्माते, सह निर्माते म्हणून सहभागी होता येणार आहे
कसदार कथेवर आधारित दर्जेदार चित्रपट निर्मिती सोबत कुशल मार्केटिंग, प्रसिध्दी व्यवस्थापन, वितरण अश्या चहूअंगाने चित्रपट निर्मितीची जबाबदारी‘राम पब्लिसिटी’ आणि ‘गगनराज एन्टरटेन्मेंट क्रिएटर्स’ यांनी स्विकारली आहे. सध्या मराठी चित्रपट व्यवसाय तेजीत असून जगभरात त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मराठी चित्रपट निर्मितीतून नफा कमविण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जाते. या धर्तीवर मराठी चित्रपट निर्मितीतून १००% नफा गुंतवणूकदारांना मिळवून देण्याचा उद्देश ठेऊन या दोन्ही संस्था कार्यरत आहेत. निर्मितीत रस असलेल्या रसिक – उद्योजकांनी अधिक महितीसाठी rampublicity@gmail.com, 08080822385 या क्रमांकांवर संपर्क साधावा.














