मुंबई – देशात असंख्य प्रतिभावंत चित्रकार आहेत.त्यांच्या कलाकृतींनी जागतिक स्तरावर पोहचविण्याचे काम केले जाणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय चित्रकारांनी मार्केटिंगचे ही महत्त्व जाणावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार व नैशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी केले.
एडोर हाऊस आर्टिस्ट सेंटर येथे प्रख्यात चित्रकार अजीत वसईकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शीतल करदेकर, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस तसेच दैनिक रामदीपच्या कार्यकारी संपादक व एनयुजेएमच्या कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ‘शोध’ या चित्रप्रदर्शनाचे थाटात उदघाटन झाले. या प्रसंगी नँशनल युनियन आॅफ जर्नालिस्टस महाराष्ट्र राज्य अध्यक्षा शीतल करदेकर, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी वसईकर यांनी शोध प्रदर्शनात सादर केलेल्या कलाकृतींचे कौतुक व्यक्त करताना त्यांच्या चित्राकृती जागतिकस्तरावर प्रसिध्दी मिळणे आवश्यक आहे, यासाठी योग्य प्रकारे मार्केटिंग होणे व नवीन प्रसार माध्यमांचा उपयोग आवश्यक आहे असे आवाहन केले. आजवर अनेक साप्ताहिके,वृत्तपत्र,यातुन व्यंगचित्र चौकटी तसेच विविध तैलचित्रातून आपली अनोखी ओळख निर्माण केलेल्या अजित वसईकर यांच्या शोध नावच्या तैलचित्र प्रदर्शनात वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील चित्रांबरोबरच अॅक्रिलिक,वॉटर कलर,मिक्स मिडीया अशा विविध माध्यमातून साकारलेल्या ७४ सुंदर चित्राकृती सादर करण्यात आल्या आहेत.उपस्थित मान्यवर आणि रसिकांनी प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. १ आक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन रसिकांना खुले आहे. याचा लाभ घ्यावा.असे आवाहन अजीत आणि प्रिया वसईकर यांनी केले आहे.