रत्नागिरी : आज रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
चिपळूण तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यात गर्मीही वाढली होती. अखेर संध्याकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विशेषतः चिपळूण तालुक्यातल्या खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. भिले, केतकी, कालुस्ते या गावांसह इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे. कारण आंबा आता कुठे तयार होऊ लागला आहे, पण या पावसामुळे आंबा खराब होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.