
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे कोकणात डोंगर खचण्याचा घटना वाढू लागल्या आहेत. चिपळूण मधील कळंबट गावातही जवळपास 2 एकर पर्यंतच्या डोंगराला मोठ्या भेगा पडून जमीन खचली आहे. त्यामुळे गावचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या डोंगराचा गावातील घरांना धोका नसला, तरी गावातून जाणारा रस्ता खचून गेल्यामुळे रहदारी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर शेतीकडे जाणारे रस्ते देखील खचू कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
गुरुवारी संध्याकाळी या भागात डोंगर खचायला सुरवात झाली. दरम्यान चिपळूण महसूल विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
















