तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
चिपळूण :विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ. संगीता भारत लोटे यांनी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत यादव यांच्यासह चिपळूण तालुका काँग्रेस आणि चिपळूण शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संगीता लोटे यांचे स्वागत करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण तालुका काँग्रेस आणि चिपळूण शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर पार पाडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर सौ. संगीता लोटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. रवीना गुजर यांनी त्यांचा परिचय करून दिला. संगीता लोटे या गेल्या अनेक वर्षांपासून चिपळूण शहर आणि परिसरात सामाजित कार्यात सक्रिय सहभाग घेतात. लायनेस क्लबच्या माध्यमातून त्यांनी 12 वर्षे काम केले. तसेच प्रयास फाऊंडेशनच्या माध्यमातूनही त्या सामाजित कार्यात सातत्याने पुढाकार घेतात. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी संगीता लोटे यांनीही मनोगत व्यक्त करून काँग्रेस पक्षात संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास चांगली संधी दिली जाते. महिलांना योग्य मान, सन्मान देणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. संगीता लोटे यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारून पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत करतो. आगामी काळात त्यांना पक्षात योग्य संधी दिली जाईल, अशी ग्वाही यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेवक करामत मिठागरी, माजी नगरसेविका सफा गोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी तालुकाध्यक्ष जीवन रेळेकर, वासुदेव सुतार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत फके, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, उपाध्यक्ष मैदनुद्दीन सय्यद, युवक काँग्रेसचे क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, मनोज दळी, रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रवीना गुजर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, सेवालदलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक निवाते, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, नंदकुमार कामत, काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, अशोक भुस्कुटे, विनायक जाधव, संजय शिगवण, संजय साळवी, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले आदी उपस्थित होते.