
चिपळूण: चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मा. श्री. सुभाराव चव्हाण यांचा ७९ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘चिपळूण नागरी परिवाराचा स्नेहमेळावा व सहकार कार्यशाळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता बहादूरशेख नाका येथील सहकार भवन मधील सहकार सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे सेवानिवृत्त अपर आयुक्त तथा सहसचिव मा. श्री. एस. बी. पाटील आणि महाराष्ट्र राज्य सहनिबंधक लेखा परीक्षण पुणेचे मा. श्री. तानाजी कवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहमेळावा व सहकार कार्यशाळेस संस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.














