
श्रावण महिन्यात सुमारे ७ हजार ५०० आवर्तक खात्यांचे ठेवीदार वाढवण्याचा संकल्प
चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची माहिती
चिपळूण – सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून ठेव योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांना सर्वसामान्यांना उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता श्रावण मासानिमित्त ठेव वृद्धीमासाचे नियोजन करण्यात आले असून सर्वांनी आवर्तक खात्याचे ठेवीदार होऊन या योजनेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करताना, दररोज *संस्थेच्या ५० शाखांतर्गत* प्रत्येकी *शाखानिहाय ५* असे *एकूण २५० ठेवीदार* *एका दिवसांत तर ३० दिवसांत ७ हजार ५०० ठेवीदार* करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. या संकल्पात यशस्वी होऊ, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच आर्थिक व्यावसायिकता सांभाळत असताना गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. शेती पूरक दुग्ध व्यवसाय, पर्यटन व्यवसाय अन्य छोट्या- मोठ्या व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करून हजारो तरुणांना स्वावलंबी बनवण्यात चिपळूण नागरीने मोठा हातभार लावला आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची गती मिळण्यासाठी *”सक्षम महिला सक्षम कुटुंब”* अशी अल्पदरात कर्ज योजना देखील राबवण्यात आली होती. या कर्ज योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला स्वावलंबी होताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर महिलांसाठी ठेवींवर देखील योग्य व्याजदर दिला जातो. तसेच सुकन्या ठेव योजनेमध्ये *९ कोटी* *५० लाख* तर गृह लक्ष्मी ठेव योजनेमध्ये *२६ कोटी ५०* लाख रुपये संकलित झाल्या आहेत.दोन्ही योजनेचे एकूण *४ हजार महिला खातेदार* आहेत. यावरून चिपळूण नागरीच्या ठेव योजनांना सर्वसामान्यांचा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
चिपळूण नागरीने सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गेल्या ३२ वर्षांच्या कालखंडात धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव, या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त, बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दाम दुप्पट, दाम तिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे धनलक्ष्मी ठेव योजनेअंतर्गत *४६ हजार ४६६* खातेदार तर उर्वरित मासिक ठेव योजनेत *४६ हजार *१६८* असे एकूण *९२* हजार *३६४* खातेदारांच्या योजनेमध्ये दर महिना *६* कोटी *२०* लाख रुपये संकलित होत आहेत.
श्रावण मासानिमित्त ठेव वृद्धी मास योजना
आता चिपळूण नागरीने श्रावण मासानिमित्त ठेव वृद्धी मास योजना सुरू केली आहे. ही ठेव योजना दिनांक २५ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीसाठी असून या योजनेंतर्गत दरमहा *१ हजार २७५ रुपये* पाच वर्षांसाठी जमा केल्यानंतर ठेवीदारांना *१ लाख रुपये* मिळणार आहेत. त्याचप्रमाणे इतरही मुदत ठेव योजनांना योग्य व्याजदर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. श्रावण मास ठेव वृद्धी मास योजनेला पहिल्याच दिवसापासून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देतांना ते पुढे म्हणाले की, चिपळूण नागरीच्या ५० शाखांतर्गत प्रत्येकी शाखानिहाय ५ ठेवीदार असे दिवसाकाठी २५० ठेवीदार तर ३० दिवसात ७ हजार ५०० ठेवीदारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच दर दिवशी प्रत्येकी शाखानिहाय २ लाख रुपये ठेवींची वाढ करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. एकंदरीत या ठेव योजनेच्या माध्यमातून सहकार चळवळ वृद्धिंगत करण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी स्पष्ट केले.
*”सहकारातून समृद्धीकडे’ नेण्याचा चिपळूण नागरीचा प्रयत्न*
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार चळवळ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, या उद्देशाने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दि.०९ जून २०२५ रोजी सहकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सेवानिवृत्त पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस. बी. पाटील यांनी सहकार चळवळ विषयी मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. *’एक पेड पेड माँ के नाम’,* या मोहिमेअंतर्गत पिंपळी खुर्द येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच सहकार चळवळ आणखी वृद्धिंगत झाली पाहिजे, या भावनेतून चिपळूण नागरीतर्फे पुढील काळात आंबा व काजू बी खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महिला बचत गटांना आर्थिकदृष्टीने सक्षम करण्यासाठी अल्प दरात कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कृषी पूरक व्यवसायांना पाठबळ दिले जात आहे. एकंदरीत चिपळूण नागरीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवून ‘ सहकारातून समृद्धी कडे’ हे धोरण बाळगले आहे.














