Ratnagiri : कोळकेवाडी धरणक्षेत्र व वाशिष्ठी नदी पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राबाहेर गेल्या 24 तासात 200 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने कोळकेवाडी धरणाच्या चार दरवाजांमधून 1 हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहेत.
- हवाई मार्गाने बचाव कार्य चालू आहे. बचाव कार्यासाठी सद्यस्थितीत खाजगी-6, कस्टम-1, पोलीस-1, नगर परिषद-02, तहसिल कार्यालय-05 बोटी मदत करीत आहेत.
- एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे.
- एनडीआरएफचे 04 बोटींसह 23 जणांचे पथक पुण्यावरुन खेड तालुक्याकडे रवाना झाले आहे. सदर पथक एक तासात खेड येथे पोहोचेल. रस्ता अनुकूल नसल्याने त्यांना उशिर होत आहे.
- रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे.
- राजू काकडे हेल्प फाऊंडेशनचे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे.
- जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथक बचावकार्यासाठी पोहोचत आहे.
- आत्तापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे 100 नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
- निवारा व्यवस्थेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीद्वारे अन्नपुरवठा, पिण्याचे पाणी तसेच 500 बेडसीट्सचा पुरवठा करण्यात आला आहे.
- नौदल विभागाला विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचत आहे.
- हवाई दलाची दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे.
- चिपळूणच्या आजूबाजूची 07 गावे पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु आहे.
- सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही.
- परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.














