मुबई, (निसार अली) : स्वदेशी जागरण मंच, कोकण प्रांतच्या वतीने चीनी वस्तूंच्या विरोधात जनजागृती मोहिम सुरु झाली आहे. त्या अंतर्गत आज मालाड पश्चिमेला कमलादेवी गौरी मित्तल कॉलेज ते लिबर्टी गार्डनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच स्वदेशीचा स्वीकार करा, असेही सांगण्यात आले. के. जी. मित्तल कॉलेजमधील एनएसएसचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. स्वदेशी जागरण मंचने चीनी वस्तुंचा बहिष्कार करा, अशा आशयाचा मजकूर असणारी पत्रके वाटली.