मुंबई, 21 मे : हाँगकाँगच्या चिली इंटरनॅशनल कंपनीने भारतात प्रथमच किलर १०० ब्ल्यू रे डिसइन्फेक्शन मशीन विक्रीसाठी आणले आहे. वजनाला हलके, बहुद्देशीय असे हे किलर १०० मशीन घर, कार्यालय, मॉल, कार किंवा वैयक्तिक वापरात अतुलनीय निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त आहे. किलर १०० चे वैशिष्ट्यपूर्ण मॉडेलटे डिझाइन जपानमध्ये तर संपूर्ण मशीन चीनमध्ये असेंबल झाले असून या उत्पादनाद्वारे जीवन सामान्य पदावर आणण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ६,९९९ रुपये किंमतीचे किलर १०० ब्ल्यू रे डिसइन्फेक्शन मशीन फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या सर्व अग्रगण्य मंचावर उपलब्ध आहे.
चिलीच्या किलर १०० मशीनचा उद्देश बाजारात प्रवेश करुन घरातील तसेच दैनंदिन आयुष्यातील बॅक्टेरियांचा नायनाट करून निर्जंतुकीकरण शक्य करणे हा आहे. किलर १०० ब्ल्यू रे डिसइन्फेक्शन मशीनसोबत २८० मिली लीटरची एक स्प्रेची बाटली येते. त्याची क्षमता २२ मिली प्रति मिनिट एवढी आहे. हे मशीन १३०० व्होल्ट वीजेवर चालते आणि वापरण्यापूर्वी १ मिनिट हिट करावे लागते. डिसइन्फेक्शन मशीनद्वारे २ ते ३ फुटांच्या अंतरावरून स्प्रे केले जाते, तेव्हा मानवी त्वचेला हानी होत नाही. तसेच या मशीनमध्ये मेडिकल व्यावसायिक किंवा डॉक्टरांनी सांगितलेले निर्जंतुकीकरणाचे कोणतेही द्रव वापरले तरी चालते.
चिली इंटरनॅशनल होल्डिंग लिमिटेडचे सीईओ सुफियान मोतीवाला म्हणाले, ‘ हे उत्पादन तयार करण्यामागील संकल्पना म्हणजे प्रत्येकाचे वैयक्तिक अथवा संस्थात्मक स्तरावरील सामान्य जीवन पूर्वपदावर आणणे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या प्रयत्न आणि अफाट मेहनतीचा हा परिणाम आहे. पुढील दोन महिन्यांत भारतात १ लाख युनिट विक्री करण्याचा कंपनीचा मानस आहे. दर्जेदार उत्पादन वॉरंटीसह देण्यास कंपनीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. थ्री एम आणि व्हिनससारख्या मास्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे बाजारात डिसइन्फेक्शन मशीनवर लक्ष केंद्रीत करण्याचा आमचा उद्देश आहे. पुढील काळात आम्ही अशा प्रकारे आरोग्य आणि स्वच्छतेवर भर देणारी नवनवीन उत्पादने आणि सोल्यूशन्स आणणार आहोत.”