नवी मुंबई :- मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून “मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे” अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे वाटसरु, प्रवासी व अन्य निष्पाप व्यक्तींचा छळ होतो. त्यामुळे मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत. कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सोशल मिडीयावरील कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये. अफवा पसरविणा-या संशयीतांवर सायबर सेलची कडक नजर असून अशा व्यक्तींवर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहनविशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र ) श्री.नवल बजाज यांनी केले आहे.