मुंबई । वंचित बहुजन आघाडीच्या विक्रोळी तालुका अध्यक्षपदी चेतन अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्त अहिरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारिप बहुजन महासंघाच्या टागोर नगर येथील कार्यालयात आज अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ‘वंचित’ चे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग विक्रोळी परिसरात आहे.
युवा नेतृत्व असणाऱ्या अहिरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ च्या उमेदवार प्रियंका खोंदले यांच्यासाठी आक्रमकरित्या प्रचार केला होता. सामाजिक कार्यकर्ते अशी अहिरे यांची ओळख आहे.
“आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सरकार राज्यात येईल. माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे. या विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविणे, पक्षाशी लोकांना जोडणे, ध्येय धोरण समजावून सांगणे, युवकांना रोजगार, आरोग्य, शिक्षण, नागरी समस्या सोडवणे आदीबाबत अधिक प्रभावी कार्य करायचे आहे, असे चेतन अहिरे यांनी सांगितले.