मुंबई : थायलंड येथे एशियन युथ चेस चॅम्पियनशिप २०१८ पार पडली. या स्पर्धेत भांडूप मधील नॅशनल शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा कु. ओम मनीष कदम याने प्रथम क्रमांक पटकावून देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. या स्पर्धेत एकूण २६ देशातील सुमारे १५० स्पर्धक सहभागी झाले होते. यात वयोगट १० मधील स्पर्धकामधून प्रथम क्रमांक पटकावून जगजेता असल्याचे सिद्ध केले. या आधी त्याने गुरगाव येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक पटकाविले होते. भारतातर्फे नोव्हेंबर महिनात स्पेन येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रतिनिधित्व ओम कदम करणार आहे. विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.