डोंबिवली, (प्रशांत जोशी) : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 69 व्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून सलग नवव्या वर्षी कै. दर्शन भालचंद्र निमकर स्मरणार्थ रविवारी सुयोग मंगल कार्यालय येथे एकदिवसीय खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्या स्पर्धकांसह बुध्दिबळपटूंचा उंदड प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धा ही खुल्या गटात खेळविण्यात आली. सदर स्पर्धेची बक्षिसे ग्रुपनुसार देण्यात आली. खुल्या गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि 7, 9, 11, 13 आणि 15 वर्षाखालील स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला हेमंत सुगंधी भांडार आणि स्वच्छंद टूर्सतर्फे गिफ्ट कुपन आणि मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात आली. सदर स्पर्धेस 172 खेळाडूंची उपस्थिती होती. मुंबई, नाशिक, पुणे तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, आदी ठिकाणाहून स्पर्धक आले होते. या स्पर्धकांमध्ये या वर्षीच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेता मोहम्मद झुबेरशू शेख या खेळाडूचा देखील सहभाग होता. सदर स्पर्धेस हरी वैशंपायन आणि मोहित लढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे सर्वात लहान आणि सर्वात वयोवृद्ध स्पर्धकांचा या वर्षीच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल : खुला गट
मोहम्मद नुबेरशह शेख, प्रतीक गेगणजे, आकाश दळवी, केतन बोरीचा, धनश्री पंडित
७ वर्षाखालील
मुले : प्रथम – रुद्र कंडपाल, द्वितीय – आनंद वेदांत, तृतीय – सिद्धार्थ बोरसे
मुली : प्रथम : सारा नाईक, द्वितीय : प्रज्ञा दीक्षित
९ वर्षाखालील
मुले : प्रथम – दक्ष जागेडिया, द्वितीय – अनिरुद्ध सतीश, तृतीय – श्रावण परते
मुली : प्रथम : हिमांशी तेंडुलकर, द्वितीय : संयुक्ता महालकर, तृतीय : प्रिशा भाटे
११ वर्षाखालील
मुले : प्रथम – अरविंद अय्यर, द्वितीय – मयुरेश पारकर, तृतीय – आर्य बहालकर
मुली : प्रथम : चोप्रा सायना, द्वितीय : राशी चौहान, तृतीय : वेदांशी पांडे
१३ वर्षाखालील
मुले : प्रथम : तरुण सीतारामन, द्वितीय : मडके अनुज, तृतीय : सप्रे वेदांत
मुली : प्रथम : विरले किमया, द्वितीय : साने वरुनी, तृतीय : किमया घाडगे
१५ वर्षाखालील
मुले : प्रथम : मनीष गोडसे, द्वितीय : दुत्ता औरिट्रो, तृतीय : मंदार पारकर
मुली : प्रथम : राजलक्ष्मी विश्वनाथन, द्वितीय : अनायदा संतोष, तृतीय : वनश्री कुननेकर