रत्नागिरी, (आरकेजी) : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीला एक वर्ष कैद आणि धनादेश रकमेच्या दुप्पट दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. जिया अहमद मुल्ला असे आरोपीचे नाव आहे़.
जिया याने फिर्यादी इब्राहीम वाडकर यांच्याकडून सन २०१३ मध्ये ३ लाख उसने घेतले होते़. या पैशातून आरोपीला वाहनासाठी लागणाऱ्या स्पीड गव्हर्नर या पार्टचा व्यवसाय करायचा होता. दरम्यान, आरोपी मुल्ला याने वाडकर यांना पैशाची परतफेड करताना ३
लाख रूपयांचा धनादेश दिला होता. दिलेला धनादेश वटला नसल्याने, वाडकर यांनी तक्रार दिली. मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. सन २०१३ मध्ये प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मुल्लाला दोषी ठरवत एक वर्ष कैद आणि दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मुल्लाने प्रमुख जिल्हाव सत्र न्यायालयात अपिल केले. या अपिलावर सुनावणी झाली. प्रथम दंडाधिकार्यांनी दिलेली शिक्षा न्यायाधीश श्री़. डिगे यांनी कायम ठेवत आरोपीला एक वर्ष कैद व धनादेश रकमेच्या दुप्पट दंड अशी शिक्षा ठोठावली. फिर्यादी वाडकर यांच्यावतीने अॅड. मनीष नलावडे यांनी बाजू मांडली.