मुंबई : चेंबूरमधील कुमुद विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शाळेच्या सभागृहात पार पडली. सभेपूर्वी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
सभेत १) मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व मंजुरी २) वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल सादर करणे आणि त्यास मंजुरी ३) अंतर्गत हिशोब तपासनीस यांची नियुक्ती करणे ४) येत्या वर्षातील कार्यक्रमांचे आयोजन व खर्चाचा अंदाज सादर करणे ५) शाळेच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा आढावा घेणे ६) येत्या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी समिती नियुक्त करणे ७) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे ऐनवेळचे विषय. असे विषय घेण्यात आले.
कुमुद विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघाची नवीन कार्यकारिणी समितीही जाहीर करण्यात आली.
१) श्री. सुदेश पानगावकर – अध्यक्ष
२) प्रा. प्रदिप जानकर – सचिव
३) श्री. युवराज पवार – खजिनदार
सदर सभेस शरद पाटील सर, मीना पाटील बाई, विलास कांबळे सर, राजेंद्र झोपे सर, सुदेश पानगावकर, प्रा. प्रदिप जानकर, युवराज पवार, वंदना उतखेडे बाई, अनुराधा बेडसे बाई, रश्मी गायकवाड बाई, राजेंद्र वाकोडे, चिंतामण गावंड, रामचंद्र परुळेकर, दिनेश म्हात्रे, तुकाराम शिंदे, महेंद्र भोईर असे माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सदर सभेचे अध्यक्षस्थान शाळेचे विश्वस्त विलास कांबळे सर भूषविले.