
डोंबिवली : चविष्ट पदार्थांसाठी पावले आपोआप फास्टफूडे वळतात. पण घरीच पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांची सांगड घालून पदार्थ बनविले तर खूप फायदा होईल. आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर व्याधी खूप लवकर दिसून येतात. पूर्वी पौष्टिक खाण्यामुळे व्याधींचा प्रसार कमी दिसून येत असे. आरोग्य टिकवायच असेल तर घरातच पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे चविष्ट पदार्थ घरीच केले तर मुले फास्टफूडकडे वळणार नाहीत असे प्रतिपादन उत्तरा मोने यांनी ‘उत्सव पाककलेचा… उत्सव खाद्यसंस्कृतिचा’ या कार्यक्रमात केले.
मिती क्रिएशन निर्मित मातोश्री प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या चौथा श्रावण महोत्सवात आगरकर रस्त्यावरील आदित्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘उत्सव पाककलेचा…उत्सव खाद्यसंस्कृतिचा’ या पाककलेच्या स्पर्धेच्या आयोजिका उत्तरा मोने, स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून उत्तरा मोने, शेफ तुषार प्रिति देशमुख, न्युटी्रशनिस्ट नमिता नानल उपस्थित होते.
स्पर्धेत सुमारे 200 महिलांनी सहभाग घेतला होता. गृहिणी असलेल्या महिलांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी श्रावण महोत्सव आयोजित केला होता. स्पर्धेसाठी महिलांना विविध प्रकारचे पराठे किंवा थेपले ‘हे पदार्थ देण्यात आले होते. याला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला. दोन फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रथमिक फेरीसाठी मधुर खेडेकर, शिल्पा महाजन, प्रसन्नता पानवडीकर, ऐश्वर्या पुणेकर, शीतल फडके या पांच स्पर्धकांची निवड करण्यात आली.
या पाककला स्पर्धेसाठी शिवानी नेमावकर, डॉ. सिंधूर कला जोशी, श्रीया जोशी, स्वाती जोशी, डॉ. स्मिता तांबरे, डॉ. सुनील जयस्वाल, शुभांगी देवचके, विजय कामेरकर, पराग बापट यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. तर सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कविता गावंड, किरण मोंडकर, अनिता मयेकर, शिल्पा मोरे, शितल धुरी, प्रतिभा पांचाळ, सुचिता पाटील, प्रजक्ता देशपांडे, विजया शिरोळकर, मानसी गावडे, नीशा रेडडी आदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यानी सहकार्य केले.















