मालाड, (निसार अली) : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले विजय साळसकर यांच्य नावाचा शहिद चौथरा मालाड पश्चिमेतील साईनाथ मंडई च्या जवळ आला आहे. रिपाइं आठवले गटाचे स्थानिक नेते हरिहर यादव यांनी या चौथऱ्याचे उदघाटन केलं होतं. आठवले गटाने पक्षाचा झेंडाही तेथे रोवला होता. या कार्यक्रमानंतर या चौथऱ्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले आहे. चौथऱ्याचे ठिकाण मासे विक्रेते,चहा वाला भांडी किंवा सामान ठेवण्यासाठी वापरत आहेत. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी शहिदांच्या नावाचा वापर या ठिकाणी होत असून त्यांचा अवमान केला जात आहे असे स्थानिकांनी सांगितले.