मुंबई : दोन दिवस समुद्राला भरती असल्याने चौपाट्यांवर किंवा समुद्रीकिनारी जाणे टाळा, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी ४.८१ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. आज सोमवारी १ वाजून ५४ मिनिटांनी समुद्रात ४.९४ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या.
मंगळवारी दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी ४.८१ मीटरच्या लाटा समुद्रात उसळतील. तसेच पुढील ४८ तासात मुंबईत ढगाळ वातावरण असेल आणि अधूनमधून तुरळक सरी कोसळतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तुफानी वार्यांमुळे समुद्रात बोटीही भरकटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक भरतीची वेळ लाटांची उंची
२७ जून दुपारी २.३९ ४.८१ मी.
२८ जून दुपारी ३.२३ ४.६० मी.