Mumbai : रेल्वेने शयनयान श्रेणीच्या डब्ब्याच्या जागी एक तृतीय वातानुकूलित डबा खालील तपशिलांनुसार पुढील गाड्यांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे:
दि. १५.५.२०२२ पासून प्रभावी
12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल (प्रयागराज छिवकी मार्गे)
12335 भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस
दि. १७.५.२०२२पासून प्रभावी
12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल (प्रयागराज छिवकी मार्गे)
12336 लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस
12321 / 12322 ची सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५
तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, आणि ४ द्वितीय आसन श्रेणी, १ पँट्री कार आणि १ जनरेटर व्हॅन.
12335/12336 ची सुधारित संरचना: २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, आणि ४ द्वितीय आसन श्रेणी आणि २ जनरेटर व्हॅन.
फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.















