डोंबिवली : नुकताच केंद्राचा जो अर्थसंसकल्प जाहीर झाला, तो स्त्री सुलभ स्वभावाचा असला तरी संदिग्ध आहे. राजचिन्ह असलेल्या पिशवीतून आणल्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे मत चंद्रदेखर टिळक यांनी व्यक्त केले.
पहिल्या महिला अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा पहिला अर्थसंकल्प आहे. या बाबत बोलताना भारतीय घराघरांतून अर्थार्जन जरी पुरूष वर्ग पुर्वीपासून करीत असला तरी अर्थव्यवस्थापन हे देखील पुर्वीपासून स्त्रियाच करत होत्या. त्यामुळे देशाच्या अर्थ नियोजनाची जबाबदारी एक स्त्री तसेच अर्थशास्त्राच्या तज्ञ म्हणून विद्यमान अर्थमंत्री सशक्तपणे सांभाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पातील संदिग्धता अधोरेखीत करताना हा अर्थसंकल्प सोशल व्हॉलन्टरी एक्स्चेंजची तरतूद करणारा आहे पण त्याच सोबत पूर्वी असलेल्या ओटीसी एक्स्चेंजच्या कमतरतांची दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे सोशल व्हॉलन्टरी एक्स्चेंजची परीस्थिती देखील ओटिसी एक्स्चेंज सारखीच होईल की काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
भारतीयांना दर वेळेस अर्थसंकल्पात अपेक्षीत असणारे तेल, महागाई, वित्तीय तुट या सारखे विषय यंदाच्या अर्थसंकल्पातून वगळून जी-सेक म्हणजेच सरकारी ठेवी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याची तरतूद करणारा आहे असेही त्यांनी सांगितले.
पॅन नंबर ऐवजी आधार नंबराचा वापर करण्याची तरतूद ही केवळ जनमानसाच्या सोयीकरता नसून देशभरात होणाऱ्या अगदी जम्मू काश्मीर व सिक्कीम या पॅन बंधनकारक नसणाऱ्या राष्ट्रांमधील आर्थिक व्यवहारांची माहिती सरकारकडे उपलब्ध व्हावी हा देखील त्या मागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.