रत्नागिरी : राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर ते चिपळूण पर्यंतच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी तसेच महामार्गावरील रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारे खात्याच्या कन्सल्टंट, यांच्यासह पहाणी केली आणि कामाचा आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे.डी.कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता श्री. नेवले, कार्यकारी अभियंता श्री. बनगोसावी, सा.बां. विभाग चिपळूणचे कार्यकारी अभियंता, श्री. उत्तमकुमार मुळे, सा.बां.उत्तर रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता श्री. सावर्डेकर, आदि मान्यवर उपस्थित होते.
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील राजापूर ते चिपळूण रस्त्याच्या पहाणी करताना म्हणाले मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून सिंधूदुर्गात लवकरच दोन पदरी रस्ता खुला होईल. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील उर्वरित महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले