मुंबई, (निसार अली) : कोकणातील शिक्षण तज्ज्ञ चंद्रकांत देशपांडे (चंदूभाई) यांचा राजापूर पूर्व विभागाच्या वतीने मौजे येळवण येथे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यांत आला. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते, लेखक,दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्यासह तालुक्यांतील विविध क्षेत्रातील विचारवंत उपस्थित होते.
चंद्रकांत देशपांडे यांनी ग्रामीण भागाचा विकास प्रमाण मानून त्यानी अनेंक मुलभूत गोष्टींचा पाठपुरावा करुन त्या धसास लावल्या आहेत . गावातील दारूबंदी, एसटी सुविधा, गाव व येळवण परिसरात की नांदावी तसेच सौंदळ रल्वे स्थानक अशा नगरी सुविधा त्यांच्या अथक प्रयत्नांनी साकारल्या. अनेक शाळा स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. यंदा विद्यानिकेतन, येळवण या शाळेचा १० वी चा निकाल शंभर टक्के लागला. हे देशपांडे यांनी केलेल्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल.
आपल्या कारकिर्दीतील बरेवाईट अनुभव देशपांडे यांनी यावेळी कथन केले. त्यांचे जुने सहकार प्रमुख्याने उपस्थित होते