
रत्नागिरी : जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानीच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पुन्हा पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेला पुराचा वेढा पडला आहे. बाजारपेठेत जवळपास पाच ते सहा फूट पाणी आहे. चांदेराई-लांजा रस्त्यावरही पाच ते सहा फुटांपर्यत पाणी आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचे मोठं नुकसान झालं आहे.
पाणी रस्त्यावर आल्यानं चांदेराई लांजा आणि चांदेराई रत्नागिरी वाहतुक ठप्प झाली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा चांदेराईला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.
















