
रत्नागिरी । गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. मात्र कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असलेले पहायला मिळत आहेत.
गणेशोत्सवासाठी सध्या लाखो चाकरमनी कोकणात दाखल होतायेत. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. बस तसेच ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काहिना सुट्टी नाहिय. मात्र तरिही कितीही त्रास झाला, तरी या सणासाठी गावी जायचच असा चंग बांधून सध्या चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनवर आलेल्या चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची लगबग पहायला मिळत आहे. मात्र गाड्या दोन ते तीन तास उशिरा, त्यात गाड्यांना गर्दी त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मात्र प्रवासाचा कोणताही क्षीण त्यांच्या चेहऱ्यावर नाहीय कारण बाप्पाच्या स्वागतासाठी हे सर्वजण आसुसलेले आहेत.















