Mumbai : मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान २९.४२ दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २०.७६ दशलक्ष टन वाहतुकीच्या तुलनेत ४१.७% वाढली आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी टीम मध्य रेल्वेचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी कामगिरी उंचावण्याकरीता चांगले काम करत राहण्याचा सल्ला दिला आहे.
मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२१ मध्ये ५.५५ दशलक्ष टन मालवाहतूक केली जी ऑगस्ट २०२० मधील ४.२९ दशलक्ष टनांच्या तुलनेत २९.३७% वाढलेली आहे. या जास्त मालवाहतुकीचे लोडिंग प्रामुख्याने मध्य रेल्वेने झोनल आणि विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (BDUs) द्वारे घेतलेल्या पुढाकारांना आहे.
*विभागवार कामगिरी*
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ऑगस्ट २०२१ मध्ये १.३६ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदविली जी गेल्या वर्षीच्या १.२८ दशलक्ष टनांच्या तुलनेत ६.२५% अधिक आहे. मुंबई विभागाने एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान ६.९९ दशलक्ष टनांची मालवाहतूक करून १८.२७% वाढ दर्शविली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ५.९१ दशलक्ष टन होती.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट २०२१ मध्ये २.९६ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे, जी गेल्या वर्षीच्या २.०९ दशलक्ष टन वाहतूकीच्या तुलनेत ४१.६२% ने वाढली आहे. नागपूर विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान १६.५३ दशलक्ष टन मालवाहतूक ५५.३५% वाढ दर्शविली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत १०.६४ दशलक्ष टन होती.
सोलापूर विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ मध्ये २.९० दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १.७१ दशलक्ष टनांच्या तुलनेत ६९.५% वाढलेली आहे.
भुसावळ विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान २.२८ दशलक्ष टन मालवाहतूक करून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २.०३ दशलक्ष टनांच्या तुलनेत १२.३१% ची वाढ दाखवली आहे.
पुणे विभागाने एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान ०.७२ दशलक्ष टन मालवाहतूक लोड करून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ०.४६ दशलक्ष टन॔च्या तुलनेत ५४% वाढ दर्शविली आहे.