
मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने या प्रकल्पाच्या कामाची गती वाढविल्यामुळे रेल्वेला मुंबई ते जवाहरलाल नेहरू बंदरासाठी हा महत्त्वपूर्ण प्रवेशयोग्य रेल्वेमार्ग पूर्ण करता येईल.
खारकोपर – उरण नवीन मार्ग बांधण्याचे काम विविध ठिकाणी बांधकाम मशिनरी जसे की, पाइल बोरिंग मशीन्स, काँक्रीट प्लेसर बूम्स , ट्रान्झिट मिक्सर्स , ट्रिपर्स, जेसीबी, हायड्रस, पोकलेन्स, हायड्रॉलिक जॅक्स इत्यादींच्या सहाय्याने प्रगतीपथावर आहे. प्रगतीपथावर असलेले महत्वपूर्ण बांधकाम उपक्रम पुढीलप्रमाणे – रांजनपाडा स्टेशनवरील कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मचे सुपरस्ट्रक्चरचे काम, न्हावा-शेवा, द्रोणागिरी व उरण स्थानकांवर फाउंडेशन व सब -स्ट्रक्चरचे काम, उरण येथील सब-वेचे काम, चैनेज १०९७५ येथे पूलाच्या फाउंडेशनचे काम, स्ट्रेसिंग आणि यू-गर्डर खाली करण्याचे पूल ७९८२ येतील काम.
खारकोपर – उरण दरम्यान ५ स्टेशन, २ मोठे पूल, ४१ छोटे पूल, २ रोड अंडर ब्रिज आणि ४ रोड ओव्हर ब्रिज असतील. उपलब्ध कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. लॉकडाउन / अनलॉक कालावधी दरम्यान राबविण्यात आलेली कामे आणि पावसाळ्यातील पावसाच्या विश्रांती दरम्यान उपलब्ध कालावधी, लॉकडाऊनमधील बांधकाम कामकाजासाठी झालेल्या वेळेचा अपव्यय निश्चितपणे भरून काढणे शक्य होईल. चेनॅज ८ कि.मी. ते चैनज ११ कि.मी. दरम्यान ४.४७९ हेक्टर जमीनीची व्यवस्था (बहुतेक वनजमिनी) सिडकोकडून अद्याप मिळणे बाकी आहे.
मध्य रेल्वे मुंबई उपनगरी नेटवर्कचा चौथा कॉरिडोर असलेला बेलापूर – सीवूड्स – उरण रेल्वे मार्ग, पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते जेएनपीटी व उरण या प्रवाशांच्या प्रवासाची वेळ कमी होईल व नवी मुंबईत नवीन तयार होत असलेल्या विमानतळावर जाण्याची सोयही प्रवाशांना होईल.